सोशल मिडियाद्वारे पत्रकारिता समृद्ध करु या! लोकशाहीचा आधारस्तंभ बनू या!
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा मिडिया सशक्त आणि सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मिडियाची मोठी मदत होऊ शकते. त्याद्वारे प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपयुक्त ठरु शकतो. यासाठी दैनिक राजतंत्र " सोशल रिपोर्टर " ही संकल्पना सादर करीत आहे. सोशल मिडियाचा वापर करणारा प्रत्येक जण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरु शकतो.
त्यासाठी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. फेक न्यूजना आळा घालणे आवश्यक आहे. समाज आणि देश घडवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर झाला पाहिजे. सोशल मिडिया आणि त्याचा वापर करणाऱ्यांची उर्जा आम्ही विधायक मार्गाने गेल्यास आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करु शकतो. त्यासाठीच्या आमच्या योजनेत सहभागी व्हा!
दैनिक राजतंत्र आयोजित करीत आहे
एक दिवसीय (45 मिनिटांच्या 9 तासिका) सोशल रिपोर्टींग कार्यशाळा
कार्यशाळेद्वारे शिकवला जाणारा अभ्यासक्रम
(45 मिनिटांच्या 3 तासिका)
1. भारताचे संविधानाचा परिचय व त्यातील अनुच्छेद 19 क
2. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया व त्याची कार्यपद्धती
3. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने निर्देशित केलेली मार्गदर्शक तत्वे.
(15 मिनिटांचा ब्रेक व त्यानंतर 45 मिनिटांच्या 3 तासिका)
4. पोलीस प्रशासन, भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा.
5. न्याय व्यवस्था व अब्रूनुकसानीचे दावे
6. बातमी लेखनाची तत्वे
(45 मिनिटांचा ब्रेक व त्यानंतर 45 मिनिटांच्या 2 तासिका)
7. बातमी लेखनाचे तंत्र
8. फेक न्यूजला आळा कसा घालायचा?
(15 मिनिटांचा ब्रेक)
9. शंका निरसन व समारोप
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सदस्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
या प्रशिक्षणानंतर आपण अधिक सक्षम व सकसपणे पत्रकारिता करु शकाल.
शुल्क अवघे 500 रुपये
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर निवडक उमेदवारांना दैनिक राजतंत्रमध्ये सोशल रिपोर्टर बनण्याची
संधी मिळेल. (अटी व शर्तीं लागू) अशा सोशल रिपोर्टर ना स्वतःच्या नावाचा प्रोफेशनल ईमेल आय. डी. (उदा. [email protected]) व ओळखपत्र दिले जाईल. ज्यायोगे तुमची बातमी थेट (स्वीकारार्ह असल्यास) स्वीकारली जाऊ शकते.
तुमच्या बातम्या www.rajtantra.com व दैनिक राजतंत्रच्या Android Application वर तुमच्या नावाने प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला तुमच्या ईमेल वर मिळेल. ती लिंक हव्या त्या सोशल मिडियावर शेअर करुन तुम्ही एक विश्वसनीय स्त्रोत बना. विश्वासार्ह बातम्या प्रसारित करुन विश्वसनीय सोशल रिपोर्टर बना. निवडक बातम्यांना दैनिक राजतंत्रमध्ये प्रसिद्धी मिळेल.
त्याशिवाय आपण काय करणार आहोत?
त्यानंतर सोशल रिपोर्टरच्या टिम बनवून विविध शासकीय कार्यालयांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकशाही दिन खरोखरच लोकशाही पद्धतीने होतो का? सेवा हक्काप्रमाणे लोकांची कामे मुदतीत होतात का? भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी प्रयत्न होतात का? अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतात का? शासकीय रुग्णालयात डॉक्टर असतात का? डॉक्टर असले तर औषधे असतात का? जबाबदार अधिकारी मुख्यालयात रहातात का? अशा कितीतरी गोष्टींकडे सक्षम नागरिक म्हणून आपल्याला लक्ष देता येईल. त्यासाठी दैनिक राजतंत्र तर्फे तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध होईल.