Rajtantra
Date-18/08/19 | Page: 1
Select Page

  • पृष्ठ क्रमांक: 1

  • पृष्ठ क्रमांक: 2

  • पृष्ठ क्रमांक: 3

  • पृष्ठ क्रमांक: 4
e-Paper - Careers
राजतंत्र : नागरिक पत्रकार
नागरिकहो! पत्रकारांनी एखाद्या गोष्टीची जितकी दखल घेतली पाहिजे तितकी घेतली जात नाही असे आपल्याला वाटते का? ज्या बातम्या वर्तमानपत्रात छापून यायला पाहिजेत तश्या येत नाहीत अशी आपली भावना आहे का? एखादया घटने विषयी, भ्रष्टाचाराविषयी अथवा प्रशासन/लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाविषयी आपले रक्त सळसळते का?
असे असेल तर चला आपण एकत्रितपणे काम करूया! सजग नागरिक बनून काही करून दाखवू या! आपणच पत्रकार बनू या!
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता असे समजले जाते. वस्तुस्थीती अशी आहे की भारताच्या राज्यघटनेत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे नागरिकांना दिलेले मुलभूत अधिकार, ज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे. या भारतीय नागरिकांना मिळालेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आधार घेऊन पत्रकार हा पत्रकारिता करीत असतो. राज्य घटनेद्वारे पत्रकारांना वेगळे असे कुठलेही अधिकार नाहीत. याचाच अर्थ प्रत्येक नागरिक पत्रकारीता करण्यास पात्र आहे.
यापतीची आम्ही एक प्रयोग करीत आहोत, त्यासाठी आपणा सर्वाना निमंत्रण आहे. वय व शिक्षणाची अट नाही. याद्वारे डॉक्टर, वकिल, प्राध्यापक अशा क्षेत्रातील विद्वान मंडळींना देखील समाजाशी संवाद साधता येणे शक्य आहे.
आज फेसबुक / whatsapp सारख्या सोशल मिडीयाचा आपण मुक्तपणे वापर करीत आहोत. मग आपण पत्रकारिता देखील करू शकतो. याकरिता प्रत्येक नागरिक हाच पत्रकार हि संकल्पना घेऊन आम्ही नागरिकांना महत्वाची भुमिका बजावण्याची संधी देत आहोत. दैनिक राजतंत्र मध्ये आपल्या जनहिताच्या बातम्या, फोटो व लेख प्रसिद्ध होऊ शकतील. आपण बनाल नागरिक पत्रकार!
सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत आहे कि एखादी घटना घडत असताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून आपण त्वरीत फोटो काढू शकतो. आपण माहीती देखील गोळा करू शकतो. आणी कदाचित कुठल्याही पत्रकाराआधी नागरीक हि बातमी जनतेपर्यंत पोहचवू शकतील. माहितीच्या अधिकाराचा कायदा वापरून आपण हवी ती माहीती मिळवू शकतो. प्रशासकीय विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 सारख्या कायद्यांचा वापर करून प्रशासनास अधिक सक्षमपणे काम करण्यास भाग पाडू शकतो. जबाबदार नागरिक बनून लोकशाही मजबूत करण्याचा आपला खारीचा वाटा ऊचलू शकतो.
अर्थात हे करताना जर नागरिकांना पत्रकारितेची मुलभूत माहीती असेल तर अधिक सकस पत्रकारिता होऊ शकेल. आणि सोशल मिडीयाच्या युगात या माध्यमांचा वापर जबाबदारीने करण्यासाठी देखील या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रशिक्षणाची व्यवस्था करणार आहोत. पत्रकारीतेची मूलतत्वे, आचारसंहिता, बातमी कशी मिळवावी, ती कशी लिहावी, छायाचित्रांचा वापर कसा करावा, संबंधीत कायदे समजून घेणे, आवश्यक त्या अन्य कायद्यांची माहीती याबाबत कार्यशाळा घेऊन ज्येष्ठ पत्रकार व मान्यवरांचे मार्गदर्शन ऊपलब्ध करून देण्याची योजना आहे.

यासाठी संपर्क साधा:
संपादक: संजीव शशिकांत जोशी
भ्रमणध्वनी: +९१-९८२२२८३४४४
इमेल: editor@rajtantra.com

 
Copyright © All Rights Reserved. This ePaper Pro v2.0 is Licensed to RAJTANTRA, Marathi Daily Newspaper.
Counter
RDestWeb
Home   Archive   Fullscreen   Share   Download   Save as PDF   Fullscreen   Print   eMail   Facebook Page      Tweet